Special Report | देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहात दुसरा बॉम्ब! आता वक्फ बोर्डाशी संबंधित ऑडिओ क्लिप समोर
देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत पुन्हा एकदा धमका केला. त्यांनी एक वक्फ बोर्डाच्या एका सदस्याचं व्हिडीओ संभाषण असलेला पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला. त्यानंतर या व्हिडीओत नेमकं काय संभाषण आहे आणि ही माणसं कोण आहेत याची माहिती दिली. या पेन ड्राईव्हमध्ये दोन पात्रं आहेत. मोहम्मद अर्शद खान आणि डॉ. मुदीस्सर लांबे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं ते मुदस्सीर लांबे हेच आहेत, असं फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत पुन्हा एकदा धमका केला. त्यांनी एक वक्फ बोर्डाच्या एका सदस्याचं व्हिडीओ संभाषण असलेला पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला. त्यानंतर या व्हिडीओत नेमकं काय संभाषण आहे आणि ही माणसं कोण आहेत याची माहिती दिली. या पेन ड्राईव्हमध्ये दोन पात्रं आहेत. मोहम्मद अर्शद खान आणि डॉ. मुदीस्सर लांबे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं ते मुदस्सीर लांबे हेच आहेत. 31 डिसेंबर 2020 ला त्यांच्या विरोधात एका 33 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा लांबेने लग्न करण्याची तयारी दाखवली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी या महिलेला दिली, असं फडणवीसांनी सांगितलं.