Special Report | भाजप – मनसे युती होणार ? -tv9
गेल्या अनेक महिन्यांपासून मनसे आणि भाजपच्या आगामी महापालिका निवडणुकीत युतीच्या चर्चा आहेत, मात्र युती होणार की बाहेरून एकमेकांना पाठबळ देणार, याबाबत दोन्ही पक्षांकडून काहीही ठोस सांगण्यात आलेले नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून मनसे आणि भाजपच्या आगामी महापालिका निवडणुकीत युतीच्या चर्चा आहेत, मात्र युती होणार की बाहेरून एकमेकांना पाठबळ देणार, याबाबत दोन्ही पक्षांकडून काहीही ठोस सांगण्यात आलेले नाही. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करून भाजप (BJP) महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी सुरू केलीय. तर काँग्रेस प्रभारी ब्रिजकिशोर दत्तही नाशिक दौऱ्यावर आहेत. येणाऱ्या काळात कधीही निवडणुका लागू शकतात. त्यामुळे सदानकदा थंड असणाऱ्या नाशिकचा राजकीय पारा वाढताना दिसतोय. आज देवेंद्र फडणवीस पाच वर्षांपूर्वीच्या बहुचर्चित आणि गेमचेंजर ठरलेल्या अशा नाशिक दत्तक घोषणेनंतर काय बोलणार, याची उत्सुकता लागलीय. कारण त्यांनी केलेल्या या घोषणेनंतरच नाशिककरांनी महापालिकेत भाजपला बहुमत दिले होते.