Special Report | शिखर धवन आणि आयशा मुखर्जीचा घटस्फोट!
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी (Aesha Mukerji) यांनी काडीमोड घेतलाय. नुकतंच आयशाने एक इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या आणि शिखरच्या (Shikhar Dhawan Divorce) घटस्फोटाबद्दल माहिती दिली. शिखरच्या बाजूने अद्याप या संदर्भात कोणतेही अधिकृत स्टेटमेंट आले नसले तरी या पोस्टने सर्वत्र खळबळ माजली आहे.

कोणत्याही महिला किंवा पुरुषासाठी घटस्फोट हा प्रसंग फारच अवघड जात असणार यात शंका नाही. त्यात आयशाच्या जीवनात हा वाईट प्रसंग दुसऱ्यांदा येत असल्याने तिच्यासाठी हे सारं अधिकच अवघड जात असणार. किक बॉक्सर असणारी आयशा कुटुंबासोबत 8 वर्षांची असताना ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली होती. शिखर आणि आयशाची ओळख सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर दोघांनी 2012 साली लग्न केलं. त्यांना जोरावर नावाचा एक मुलगाही आहे.
आयशाचं याआधीही एक लग्न झालं होतं. विशेष म्हणजे शिखरपेक्षा ती 10 वर्षांनी मोठी असून तिला दोन मुलीही आहेत. असं सर्व असतानाही दोघांनी समजूतीने लग्न करत 9 वर्ष संसार केला. अनेकदा शिखरच्या इन्स्टाग्रामवर आयशा आणि मुलाचे व्हिडीओ, फोटो असं सारं काही असायचं. पण या सर्व सुखावर विरजण आलं आणि आता दोघेही वेगळे होत आहेत.