Special Report | शिवसेनेच्या भावना गवळींच्या मागे ईडीचा ससेमिरा, निकटवर्तीयांना अटक
खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना अंमलबजावणी संचलनालय (ED) अर्थात ईडीने समन्स पाठवलं आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान (Saeed Khan) याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा भावना गवळी यांच्याकडे वळवला आहे. खासदार गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना अंमलबजावणी संचलनालय (ED) अर्थात ईडीने समन्स पाठवलं आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान (Saeed Khan) याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा भावना गवळी यांच्याकडे वळवला आहे. खासदार गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.
मनी लाँडरिंग अर्थात पैशांच्या अफरातफरी प्रकरणात भावना गवळी यांचा निकटवर्तीय असलेल्या सईद खानला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती. . त्यांना ईडी कोर्टात हजर केलं असता 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.