Special Report | Viral Audio Clip वरुन Babanrao Lonikar गोत्यात – Tv9
माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, बबनराव लोणीकर यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे.
औरंगाबाद : माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, बबनराव लोणीकर यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. लोणीकर यांनी एका वीज अभियंत्याला शिविगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार आता या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदवले यांनी यांनी दिली आहे. इतकंच नाही तर लोणीकर यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. औरंगाबादेतील गुणरत्न सोनवणे आणि नागराज गायकवाड या दोघांनी औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दलित समाजाचा अपमान केल्यामुळे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय.
Published on: Mar 31, 2022 09:29 PM