Special Report | Girish Mahajan यांची डुलकी, Ashish Shelar यांची कोपरखळी -Tv9

| Updated on: Mar 07, 2022 | 9:57 PM

फडणवीस तावातावाने बोलत असतानाच त्यांच्याच पाठी बसलेले भाजपचे नेते गिरीश महाजन डुलकी घेत होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या आशिष शेलारांनी महाजन यांना हाताच्या कोपऱ्याने खुणावत झोपेतून जागे केले.

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयातील गोळीबार प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरलं. जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार होतोच कसा? असा सवाल करत फडणवीसांनी सरकारला अक्षरश: घेरण्याचा प्रयत्न केला. फडणवीस तावातावाने बोलत असतानाच त्यांच्याच पाठी बसलेले भाजपचे नेते गिरीश महाजन डुलकी घेत होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या आशिष शेलारांनी महाजन यांना हाताच्या कोपऱ्याने खुणावत झोपेतून जागे केले. त्यामुळे महाजन खडबडून जागे झाले आणि त्यांनीही फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळला. महाजन डुलकी घेत असतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महाजन यांची डुलकी, शेलारांचं कोपराने खुणावणं आणि नंतर हाताची अॅक्शन करत गोळीबार झाल्याचं सांगणं… हे सर्व व्हिडीओत दिसत असून त्यावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.

Special Report | Devendra Fadnavis यांच्या गाडीवर चप्पल फेकणारा नेमका कोण? -Tv9
Special Report | सध्या भारताबाबत पाकिस्तानी मीडियात काय सुरुय -Tv9