Special Report | भाजप नेते गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार ?
गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांवर गुन्हे दाखल झालेत. त्यातच दोन दिवस पुणे पोलिसांनी आरोपी आणि संशयितांच्या घरी झाडाझडती घेऊन टेम्पो भरुन कागदपत्रं जप्त केलीत..या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय. पण त्यात अजून तरी गिरीष महाजनांचं नाव नाही. तर खोटी केस दाखल केली असून, सत्य समोर येईल असं गिरीश महाजन म्हणत आहेत.
जळगावातून पुणे पोलिसांनी चक्क टेम्पो भरुन कागदपत्रं जप्त केलीत. त्यामुळं भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा पुणे आणि जळगावात सुरु झालीय. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कथित वादात पुणे पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवलाय. गिरीश महाजनांना गोत्यात आणणारं हे प्रकरण नेमकं काय आहे, ते आधी पाहुयात.
जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादात भोईटे गटात वाद झाल. यात भोईटे गटाला मदत करुन गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी डांबून ठेवल्याचा आरोप जळगावातील तक्रारदार अॅड. विजय पाटील यांनी केला. डांबून ठेवण्यासह मारहाण करुन खंडणी वसूल केल्याची तक्रारही विजय पाटील यांनी जानेवारी 2021 मध्ये केली. जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये आधी गुन्हा दाखल झाला. मात्र मारहाणीची घटना पुण्यातल्या हद्दीत घडल्यानं निभोंरा पोलिस स्टेशनमधून गुन्हा पुण्यातल्या कोथरुड पोलिसात वर्ग करण्यात आला.
यात गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांवर गुन्हे दाखल झालेत. त्यातच दोन दिवस पुणे पोलिसांनी आरोपी आणि संशयितांच्या घरी झाडाझडती घेऊन टेम्पो भरुन कागदपत्रं जप्त केलीत..या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय. पण त्यात अजून तरी गिरीष महाजनांचं नाव नाही. तर खोटी केस दाखल केली असून, सत्य समोर येईल असं गिरीश महाजन म्हणत आहेत.