Special Report | गृहखातं असूनही राष्ट्रवादी मवाळ, शिवसेनेचा आक्षेप -Tv9
विरोधी पक्षांनी काँग्रेस सोबत शिवसेनेचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु केल्या. तर दुसरीकडे भाजपविरोधात राष्ट्रवादी मवाळ भूमिका घेत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र ही मवाळ भूमिका शिवसेनेला मात्र खटकत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात सत्ता स्थापन केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या 25 आमदारांनी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या लेटरहेडवर प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची मागणी केली आहे. काँग्रेस आमदारांच्या या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. काँग्रेस आमदार नेमक्या कोणत्या कारणासाठी सोनिया गांधी यांना भेटणार आहेत यावरुन राज्याच्या राजकारणात तर्क वितर्क सुरु झाले होते. विरोधी पक्षांनी काँग्रेस सोबत शिवसेनेचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु केल्या. तर दुसरीकडे भाजपविरोधात राष्ट्रवादी मवाळ भूमिका घेत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र ही मवाळ भूमिका शिवसेनेला मात्र खटकत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.