Special Report | अफगाणिस्तानातील घडामोडींचा भारतावर परिणाम, भारतातील ड्राय फ्रूट्सचे दर वाढले
अफगाणिस्तानात तख्तापलट होण्यापूर्वी मुंबईत बदामाची किंमत 680 रुपये किलो होते. मात्र, आता अफगाणीस्तानातील बदलांमुळे मुंबईत बदामांची किंमत 1 हजार 50 रुपये किलो झाली आहे. याशिवाय बाजारात काजू, पिस्ता आदींची किंमत वाढली आहे. येत्या काही दिवसांत हे भाव अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर आता तिथल्या परिस्थितीचा परिणाम भारतीय बाजारावरही होताना दिसून येतोय. मुंबई सुक्या पदार्थांचे भाव वाढले आहेत. अफगाणिस्तानात तख्तापलट होण्यापूर्वी मुंबईत बदामाची किंमत 680 रुपये किलो होते. मात्र, आता अफगाणीस्तानातील बदलांमुळे मुंबईत बदामांची किंमत 1 हजार 50 रुपये किलो झाली आहे. याशिवाय बाजारात काजू, पिस्ता आदींची किंमत वाढली आहे. येत्या काही दिवसांत हे भाव अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात होणाऱ्या घडामोडीचे परिणाम आता थेट तुमच्या खिशावर होताना दिसत आहेत.