Special Report | Beed मध्ये ‘पुष्पा’ला टक्कर देण्यासाठी ‘डॉन’ मैदानात!- tv9
संदीप क्षीरसागर यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग मारून तरुणांची मनं जिंकली होती. मात्र त्या डायलॉगनंतर डॉन चित्रपटाचं मै हू डॉन... हे गाणं गात योगेश क्षीरसागर यांनी त्यांना थेट आव्हान दिलं.
बीड: आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात योगेश क्षीरसागर यांनी केलेलं शक्तीप्रदर्शन खूप काही सांगून गेलं. काही दिवसांपूर्वी संदीप क्षीरसागर यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग मारून तरुणांची मनं जिंकली होती. मात्र त्या डायलॉगनंतर डॉन चित्रपटाचं मै हू डॉन… हे गाणं गात योगेश क्षीरसागर यांनी त्यांना थेट आव्हान दिलं. तसंच ‘पुष्पाला सांगा… डॉन आलाय…’ असा संदेशही त्यांनी जमलेल्या नागरिकांना दिला होता. त्यामुळे बीडमधील आगामी निवडणुकीत संदीप विरुद्ध योगेश या सख्ख्या चुलत भावांमधील राजकीय युद्ध अधिकच रंगतदार होणार, अशी चर्चा बीडमधील राजकीय वर्तुळात सुरु आहे.