Special Report | अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंवर केंद्राची नजर!
नारायण राणे यांना आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला. राजनाथ सिंह यांनी फोन करुन राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली. नारायण राणे सध्या त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कोकणात आहेत. एक एक तालुका-गावात जाऊन ते जनतेचा आशीर्वाद घेत आहेत. आज यात्रेदरम्यान नारायण राणे यांना राजनाथ सिंहांचा तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन आला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा चर्चेचा विषय ठरत आहे. राणे आपल्या वक्तव्यांनी माध्यमांच्या केंद्रस्थानी आहेत. भाजपबरोबर सत्ताधारी महाविकास आघाडी देखील राणेंच्या यात्रेवर लक्ष ठेवून आहे. याचदरम्यान नारायण राणे यांना आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला. राजनाथ सिंह यांनी फोन करुन राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली. नारायण राणे सध्या त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कोकणात आहेत. एक एक तालुका-गावात जाऊन ते जनतेचा आशीर्वाद घेत आहेत. आज यात्रेदरम्यान नारायण राणे यांना राजनाथ सिंहांचा तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन आला. माध्यमांचे कॅमेरे साहजिक राणेंवर खिळलेले होते. यावेळी माध्यमांच्या कॅमेरात राणे-राजनाथ सिंह यांचा संवाद कैद झाला.