Special Report | ना बॅंड..ना बारात..! तरी आव्हाडांच्या कन्येच्या लग्नाची चर्चा जोरात !

| Updated on: Dec 08, 2021 | 12:00 AM

राजकीय वर्तुळामध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत, प्रत्येक जण आपल्या मुलीचे लग्न अगदी थाटात लावून देताना दिसत आहे. पण अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने केला. जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आणि एलन पटेल यांचा विवाह रजिस्टर पद्धतीने विवाह संपन्न झाला.

या प्रसंगी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड भावूक झालेले दिसले. एका बापाच्या भावूक भावना त्यांच्या डोळ्यात दिसत होत्या. यावेळी माध्यामांसमोर त्यांनी आपले मन मोकळे केले. 25 वर्ष आपल्या अंगा खांद्यावर खेळलेली मुलगी आता आपल्या घरात नसणार ही भावनाच खूप वेदनादायी आहे. या कठीण वेळी एखाद बाप काय बोलणार, असे म्हणत त्यांनी त्यांचे डोळे पुसले. किताही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी मन तयार होत नाही. आपल्यावर प्रेम करणारी, वेळेप्रसंगी ओरडणारी मुलगी उद्या घरात नसणार म्हणजे घराचं घरपणच जाणार. लग्न साध्या पद्धतीने व्हावे ही मुलीचा इच्छा होती म्हणूनच या पद्धतीने लग्न करण्यात आले आहे, अशा भावना यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या.