Special Report | कसबा पॅटर्नमुळे पुणे महापालिकेत भाजपला फटका बसणार?

| Updated on: Mar 06, 2023 | 1:02 PM

कसब्यानंतर आता काँग्रेस आपला जुना बालेकिल्ला पुणे पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. यावरचा हा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट.

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत झालेल्या भाजपच्या पराभवामुळे काँग्रेसचा ( Congress ) आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळे येणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी ( Pune Municipal election ) आता काँग्रेसने विजयासाठी तयारी सुरु केली आहे. पुण्यात भाजपला ( BJP ) टक्कर देण्यासाठी काँग्रेसला काम करावे लागणार आहे. कसबा मतदारसंघातील विजयामुळे याचा फायदा करुन घेण्यासाठी काँग्रेसकडे चाचपणी सुरु आहे. मुक्ता टिळक ( Mukta Tilak ) यांना २१ हजारांचं मताधिक्य मिळालं होतं. ते मिळविण्यात रासने यांना अपयश आलं. पुण्यात महापालिकेत पाच वर्षे एकहाती सत्ता, पुण्याचा खासदार आणि पाच आमदार अशी भाजपची ताकद आहे. पण तरी देखील कसब्यात भाजपचा पराभव झाला. त्यामुळे भाजपकडून ही आत्मपरीक्षण सुरु आहे.

चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांच्यासह पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांसाठी हा पराभव डोकेदुखी ठरु शकतो. कसबा विधानसभा मतदारसंघात १८ पैकी १२ नगरसेवक भाजपचे आहेत.कसबा पेठ मतदारसंघाला अडीच वर्षे महापौरपद होतं, तीन वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद आणि तब्बल दोन वेळा सभागृह नेतेपद असताना ही भाजपचा पराभव झाला. त्यामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला संधी दिसत आहे. काँग्रेस याचा फायदा कसा करुन घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Mar 06, 2023 01:02 PM
औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचं उपोषण; उपोषणाच्या मंडपातच बिर्याणीवर ताव!
बाळासाहेब तुमची स्वतःची प्रॉपर्टी नाही!; शिवसेनेच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल