Special Report | Kirit Somaiya आणि Neil Somaiya जेलमध्ये जाणार, Sanjay Raut यांचा इशारा -Tv9

| Updated on: Feb 18, 2022 | 10:38 PM

याला स्वप्नात बंगले दिसतात. हा काही तरी भुताटकीचा प्रकार आहे. भाजपच्या लोकांना भुताटकीनं झपाटलं आहे. त्यांच्या स्वत:च्या बेनामी प्रॉपर्टी स्वप्नात दिसतात आणि दुसऱ्यांच्या म्हणून बोंबलतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मुंबई: कोण आहे किरीट सोमय्या? सोडून द्या. वेडा माणूस आहे, इकडे तिकडे फिरत असतो. मी कालच सांगितलं तो तुरुंगात जाईल, तो तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे. तो पळत आहे इकडे तिकडे, पळू द्या. मी त्यावर बोलणार नाही. लवकरच इथली जनता त्याची धिंड काढेल. तो पुढे लोक मागे. तो पुढे लोक मागे अशी त्याची अवस्था होईल. सोडून द्या. वेट अँड वॉच. तो कुठे जात आहे? बंगले शोधणार आणि घरे शोधणार, असा सवाल करतानाच भाजपच्या लोकांना भुताटकीने झपाटलं आहे. त्यांनाही स्वप्नात बंगले दिसत आहेत, असा हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी चढवला. बंगले अदृश्य झालेत का? आम्हीही विचारतोय बंगले कुठे आहेत? सोमय्याच्या स्वप्नात बंगले येतात, वेडा झालाय तो. त्याला स्वत:चे बंगले स्वप्नात दिसत आहेत. त्याची बेनामी प्रॉपर्टी कुठे असेल तर ते त्याला दिसत आहे. कागदपत्रं सरपंचांनी दिले आहेत. त्या जमिनीवर एकही बंगला नाही. बांधकाम नाही. याला स्वप्नात बंगले दिसतात. हा काही तरी भुताटकीचा प्रकार आहे. भाजपच्या लोकांना भुताटकीनं झपाटलं आहे. त्यांच्या स्वत:च्या बेनामी प्रॉपर्टी स्वप्नात दिसतात आणि दुसऱ्यांच्या म्हणून बोंबलतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Special Report | Anvay Naik यांच्या आत्महत्येचं प्रकरण काय? -Tv9
Special Report | Sangli मध्ये Thackeray सरकारविरोधात Raju Shetti रस्त्यावर – Tv9