Special Report | Refinery प्रकल्पासाठी नाणारऐवजी बारसू गावात जागा!-tv9
नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प करण्यास स्थानिकांनी विरोध केल्यानंतर आता या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. विदर्भात हा प्रकल्प आणण्याची मागणी भाजप आणि काँग्रेसकडून होत असली तरी आघाडीचे नेते मात्र हा प्रकल्प कोकणातच करण्यास इच्छुक आहेत.
मुंबई: नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प करण्यास स्थानिकांनी विरोध केल्यानंतर आता या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. विदर्भात हा प्रकल्प आणण्याची मागणी भाजप आणि काँग्रेसकडून होत असली तरी आघाडीचे नेते मात्र हा प्रकल्प कोकणातच करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राजापूरच्या बारसू येथे हा प्रकल्प उभारण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कोकणात रिफायनरीचा मुद्दा पुन्हा तापलाय. बारसू सोलगाव धोपेश्वर रिफायनरीसाठी 13 हजार एकर जागा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे. तसेच बारसूमध्येच हा प्रकल्प का झाला पाहिजे याची कारणेही या पत्रातून देण्यात आली आहेत. मात्र, आता राजापूरकरांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. बारसूमध्ये हा प्रकल्प होऊ नये म्हणून जोरदार निदर्शने सुरू आहेत. बारसूमध्येच हा प्रकल्प का केला जात आहे? याचा घेतलेला हा आढावा.