Special Report | महाराष्ट्रात 11 जिल्ह्यात निर्बधच, 25 जिल्ह्यात शिथिलता
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झालेल्या आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तर राज्यातील 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झालेल्या आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तर राज्यातील 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या 11 जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे.