Special Report | राज्यात निर्बध जैसे थेच…कोणतीही सूट नाही !
बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना निर्बंध शिथील करण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. त्यावरुन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलबाबत तर राज्यातील व्यापारी वर्गाला दिलासा देण्यासाठी निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना निर्बंध शिथील करण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. त्यावरुन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईकरांसाठी लोकलचा विचार झाला नाही तर आपण रेल्वे रुळावर उतरु, असा इशाराच दरेकरांनी ठाकरे सरकारला दिलाय.