Special Report | विधानसभेतच फाशी घेणार, Ravi Rana यांचा इशारा -Tv9

| Updated on: Mar 07, 2022 | 9:48 PM

अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्यानंतर रवी राणा यांच्यावर 307 आणि 353चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार रवी राणा यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवरच आरोप केले.

मुंबई: अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्यानंतर रवी राणा यांच्यावर 307 आणि 353चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार रवी राणा यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवरच आरोप केले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी फोन केल्यामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी खोटं बोलत असेल तर माझ्याकडे पेन ड्राईव्ह असून त्यात सर्व पुरावे आहेत. मी घटनास्थळी नसताना आणि दिल्लीत असताना माझ्यावर गुन्हा दाखल करत असाल तर मी विधानसभेतच फाशी घेईल, असा संतप्त इशारा आमदार रवी राणा यांनी दिला. तर, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी मुख्यमंत्री किंवा आपण कुणालाही फोन केला नसल्याचं स्पष्ट करत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.

Special Report | तेच Shiv Sena Bhavan… Sanjay Raut यांचं नवं टार्गेट कोण? -Tv9
Special Report | Devendra Fadnavis यांच्या गाडीवर चप्पल फेकणारा नेमका कोण? -Tv9