Special Report | महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे पिता-पुत्र मैदानात!
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे पक्षात चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत.
मनसे नेते अमित राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुण्यात आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे पक्षात चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. पक्षांतील नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन ते विविध विषय समजून घेत आहेत. त्यातच आता महापालिका निवडणुका असल्याने अमित यांचा अॅक्टिव्हनेस वाढलाय. त्यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक दौरा केला होता. त्यानंतर आज पुन्हा ते नाशिकच्या दौऱ्यावर आले आहेत.