Special Report | विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकून भाजपची प्रतिविधानसभा !
भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले होते. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील आजूबाजूलाच बसले होते. यावेळी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना अभिरुपी विधानसभाचे अध्यक्ष करण्यात आले.
विधानसभेचा पहिला दिवस आमदारांच्या निलंबनावरून गाजला. आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विरोधक सभागृहात उपस्थित राहून गोंधळ घालतील असे संकेत होते. मात्र, भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले होते. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील आजूबाजूलाच बसले होते. यावेळी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना अभिरुपी विधानसभाचे अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. यावेळी त्यांनी काल झालेला प्रकार या अभिरुप विधानसभेच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून दिला. तसेच सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव मांडला. हे सरकार जुल्मी सरकार आहे. वसुली सरकार आहे. हे भ्रष्टाचारी सरकरा आहे. त्याचा आम्हाला पर्दाफाश करायचा आहे, असं फडणवीस म्हणाले. तसेच या अभिरुप विधानसभेत काही सदस्य बोलणार असून त्यांना बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.