Special Report | लोकलचा निर्णय 12 ऑगस्टला? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
लोकल सुद्धा कधी सुरू होणार? असं विचारलं जात आहे. त्याच्यावरही विचार सुरू आहे. काही गोष्टींना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दुकानांच्या वेळांनाही शिथिलता दिली आहे. इतर गोष्टींनाही शिथिलता मिळेल. पण जबाबदारी घेऊन आणि जबाबदारीचं भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यांतील निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, मुंबई लोकल कधी सुरू होणार? हा प्रश्न अनिर्णित आहे. त्यावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे. काही ठिकाणी चिंता करायला लागू नये अशी आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी देण्यात आली नाही. याचा अर्थ असा नाही की हे कायमचं बंद राहील. लोकल सुद्धा कधी सुरू होणार? असं विचारलं जात आहे. त्याच्यावरही विचार सुरू आहे. काही गोष्टींना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दुकानांच्या वेळांनाही शिथिलता दिली आहे. इतर गोष्टींनाही शिथिलता मिळेल. पण जबाबदारी घेऊन आणि जबाबदारीचं भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले.
Published on: Aug 05, 2021 09:40 PM