Special Report | Metro चं श्रेय नेमकं Devendra Fadnavis की Uddhav Thackeray यांचं?- Tv9

| Updated on: Apr 01, 2022 | 9:10 PM

मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांवरील सेवा मुंबईकरांच्या सेवेत गुढीपाडव्यापासून रुजू होत आहेत. मात्र आता उद्घाटनावरून वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी यावर बहिष्कार टाकला आहे. कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्घाटनाला निमंत्रण दिले नाही. 

मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांवरील सेवा मुंबईकरांच्या सेवेत गुढीपाडव्यापासून रुजू होत आहेत. मेट्रो 7 आणि मेट्रो 2-ए या मार्गावरील सेवांची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली आहे. मुंबईत मेट्रो -7 म्हणजेच रेड लाईन आणि मेट्रो -2 ए म्हणजेच यलो लाइनच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे करणार आहेत. दोन्ही मेट्रोची अपेक्षित कामे जवळपास पूर्ण झाली असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून आवश्यक प्रमाणात प्राधिकरणाला मिळाले आहे. मात्र आता उद्घाटनावरून वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी यावर बहिष्कार टाकला आहे. कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्घाटनाला निमंत्रण दिले नाही.

Special Report | Nana Patole यांचे वकील Satish Uke ED कोठडीत -tv9
Special Report | भाजपवर आरोपांनंतर Sharad Pawar VS Devendra Fadnavis -Tv9