Special Report | मुंबईत सलग चौथ्या दिवशी रुग्ण कमी येण्याचं कारण काय ?
दुसऱ्या लाटेत प्रत्येक व्यक्ती कोणता- ना कोणता नातलग दवाखान्यात अॅडमिट होता. या लाटेत मुंबई आणि पुण्यात प्रत्येकाच्या ओळखीतला एक तरी व्यक्ती बाधित आहे. मात्र यातला मोठा फरक म्हणजे तिसऱ्या लाटेत एखाद्या रुग्णाला तातडीनं दवाखान्यात दाखल करण्याची वेळ क्वचितच आलीय. त्यात काल मुंबईत ओमिक्रॉनच्या फैलावानंतर पहिल्यांदाच बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरं होणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा राहिला.
दुसऱ्या लाटेत प्रत्येक व्यक्ती कोणता- ना कोणता नातलग दवाखान्यात अॅडमिट होता. या लाटेत मुंबई आणि पुण्यात प्रत्येकाच्या ओळखीतला एक तरी व्यक्ती बाधित आहे. मात्र यातला मोठा फरक म्हणजे तिसऱ्या लाटेत एखाद्या रुग्णाला तातडीनं दवाखान्यात दाखल करण्याची वेळ क्वचितच आलीय. त्यात काल मुंबईत ओमिक्रॉनच्या
फैलावानंतर पहिल्यांदाच बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरं होणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा राहिला.
मुंबईतल्या मागच्या ५ दिवसांच्या दैनंदिन आकड्यांवर नजर टाकली तर.
>> 6 जानेवारीला 20 हजार 181 रुग्ण आले
>> 7 जानेवारीला 20 हजार 971
>> 8 जानेवारीला 20 हजार 318
>> 9 जानेवारीला 19 हजार 474
>> आणि 10 जानेवारीला आठवड्यातले सर्वात कमी रुग्ण म्हणजे 13 हजार 648
10 जानेवारीला मुंबईत नव्या रुग्णांमध्ये 13 हजार 648 जणांची भर पडली. मात्र त्याच दिवशी 27 हजार लोकांनी कोरोनावर मात सुद्धा केली.