Special Report | Nana Patole यांचे वकील Satish Uke ED कोठडीत -tv9

| Updated on: Apr 01, 2022 | 9:00 PM

नाना पटोले म्हणाले, नितीन गडकरी यांच्या विरोधातील पिटीशनमध्ये सतीश उके हे माझे वकील आहेत. रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणामध्येही ते माझे वकील आहेत. वकील आपली केस लढतात. याचा अर्थ सतीश उके हे नाना पटोलेंचे वकील, अशी हवा तयार केली जात आहे.

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुंबईवरून एकाच विमानानं नागपूरला आले. या दोन्ही नेत्यांनी एकाच विमानातून प्रवास केला. नाना पटोले म्हणाले, राजकीय विरोध असू शकतो. पण, देवेंद्र फडणवीस हे चांगले मित्र आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील पिटीशनमध्ये सतीश उके हे माझे वकील आहेत. रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणामध्येही ते माझे वकील आहेत. वकील आपली केस लढतात. याचा अर्थ सतीश उके हे नाना पटोलेंचे वकील, अशी हवा तयार केली जात आहे. हे भाजपचे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

Special Report | राष्ट्रवादीच्या गृहखात्यावरुन खटके का उडतायत? – Tv9
Special Report | Metro चं श्रेय नेमकं Devendra Fadnavis की Uddhav Thackeray यांचं?- Tv9