Special Report | Narayan Rane VS Shivsena सामना शिगेला -Tv9
या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी देखील उडी घेतली आहे. राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर राणेंनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार निशाणा साधला होता.
मुंबई : राज्यातील राजकारण एका स्फोटक वळणावर येऊन ठेपल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कारण किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीवर आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा आरोप केलाय. त्यानंतर संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर देत गंभीर आरोप केले आहेत. आता या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी देखील उडी घेतली आहे. राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर राणेंनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आता राणेंनी शिवसेना खासदार विनायक राऊतांना उद्देशून एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली. त्या प्रकरणाची चौकशी परत होईल, असा दावा नारायण राणेंनी केलाय.