Special Report | नवाब मलिक यांचा राजीनामा नाहीच, मविआची रोखठोक भूमिका
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानावरही महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना आज ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर आता राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, नेते आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानावरही महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.