Special Report | प्रवीण दरेकरांच्या राष्ट्रवादीबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचा भडका!

| Updated on: Sep 14, 2021 | 9:40 PM

राष्ट्रवादी काँग्रेसला गरिबाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरुरमध्ये केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन जोरदार राजकारण रंगलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला गरिबाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरुरमध्ये केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. “तुमच्या बोलण्यावरुन तुमच्या पक्षाची संस्कृती काय आहे हे दिसून येतं. प्रवीणजी दरेकर आपण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय, त्याच्याबद्दल आपण महिलांची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड सुद्धा रंगवू शकतो याची सुद्धा जाणीव आपण ठेवावी”, असा इशाराच चाकणकर यांनी दिलाय.

चाकणकरांच्या या इशाराला आता दरेकरांनीही उत्तर दिलं आहे. मी कुणाच्या वक्तव्याला फारसं महत्व देत नाही. गाल सर्वांनाच रंगवता येतात, कुणीही अतिरेकी भाषा करु नये. ती मराठीत म्हण आहे, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. राष्ट्रवादी पक्ष हा धनदांडग्यांना जवळ करणारा पक्ष आहे असा त्याचा अर्थ होतो, असं दरेकर म्हणाले आहेत.

Pune | प्रवीण दरेकरांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन
Special Report | संजय राऊतांचा मोदींवर निशाणा, नितेश राणेंशी सामना!