Special Report | मी जेलला घाबरत नाही, देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला इशारा

| Updated on: Mar 14, 2022 | 8:58 PM

फडणवीस यांनीही पोलिसांच्या या कारवाईवरुन सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "माझ्या वडिलांवरही कोणताही गुन्हा नसताना इंदिरा गांधींनी त्यांना दोन वर्ष आणि काकूंना अठरा महिने जेलमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे आम्ही जेल वगैरेला घाबरत नाही', असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा काल मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यावरून आज विधानसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. फडणवीस यांनीही पोलिसांच्या या कारवाईवरुन सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “माझ्या वडिलांवरही कोणताही गुन्हा नसताना इंदिरा गांधींनी त्यांना दोन वर्ष आणि काकूंना अठरा महिने जेलमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे आम्ही जेल वगैरेला घाबरत नाही’, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

मुंबई पोलिसांकडून मला एक प्रश्नावली देण्यात आली होती. त्यात मला साक्षीदार म्हणून प्रश्नांची उत्तरं देण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, काल मला चौकशीदरम्यान विचारलेले प्रश्न हे आरोपी म्हणून होते. मला विचारलेले प्रश्न हे आरोपीला विचारतात तसे विचारण्यात आले. असे प्रश्न साक्षीदाराला विचारतात का?, माझी प्रश्नावली कोणी तरी मुद्दामहून बदलल्याचा आरोपही फडणवीस यांनी सभागृहात केला.

Special Report | देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहात दुसरा बॉम्ब! आता वक्फ बोर्डाशी संबंधित ऑडिओ क्लिप समोर
दाऊद, दाऊद, दाऊद, करताय, ‘ती’ नियुक्ती आमची नाहीच! : दिलीप वळसे पाटील