Special Report | …तर मार्चपर्यत जग कोरोनातून मुक्त होईल का ?
ही गूड न्यूज आहे ओमिक्रॉन आणि डेल्टा ह्या कोरोनाच्या व्हेरीएंटबद्दलची. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन आणि डेल्टावर एक प्रयोग करण्यात आला. ह्या अभ्यासाचे निष्कर्ष कोरोनाचा अंत सुरु झाल्याची आशा निर्माण करणारे आहेत. त्यामुळेच ओमिक्रॉन हे संकट नसून संकटमोचक असल्याचा दावा काही जाणकार करतायत. अमेरिकेतील हृदयरोग तज्ज्ञ इमरानी यांनी ओमिक्रॉन हा कोरोनाच्या अंताची सुरुवात असल्याचं म्हटलंय.
मुंबई, दिल्लीसह देशात ओमिक्रॉनचा विस्फोट झाल्याचं चित्रं आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अचानक दुप्पट झालीय. त्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांची वाढलेली संख्याही लक्षणीय आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊनचं संकट घोंगावतंय असं वाटत असतानाच आफ्रिकेतून एक गूड न्यूज आहे. ही गूड न्यूज आहे ओमिक्रॉन आणि डेल्टा ह्या कोरोनाच्या व्हेरीएंटबद्दलची. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन आणि डेल्टावर एक प्रयोग करण्यात आला. ह्या अभ्यासाचे निष्कर्ष कोरोनाचा अंत सुरु झाल्याची आशा निर्माण करणारे आहेत. त्यामुळेच ओमिक्रॉन हे संकट नसून संकटमोचक असल्याचा दावा काही जाणकार करतायत. अमेरिकेतील हृदयरोग तज्ज्ञ इमरानी यांनी ओमिक्रॉन हा कोरोनाच्या अंताची सुरुवात असल्याचं म्हटलंय.
ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण तेही सुरुवातीच्या टप्यात दक्षिण आफ्रिकेत मिळाले. त्यामुळे तिथं जे काही रुग्णांसोबत घडलं, त्याचा अभ्यास केला गेला. त्याच अभ्यासाच्या जोरावर ओमिक्रॉनबद्दलची प्राथमिक माहिती, अंदाज बांधले गेले. त्यातलाच एक अभ्यास ओमिक्रॉनबद्दलचा आहे. अशा 33 जणांचा अभ्यास केला गेला ज्यांनी दोन्ही डोस घेतले होते आणि काहींनी घेतलेही नव्हते. पण ओमिक्रॉनची लागण झाली होती. 14 दिवसानंतर असं लक्षात आलं की, ओमिक्रॉनची तटस्थ रहाण्याची क्षमता 14 पटीनं वाढली. एवढच नाही तर डेल्टासारखा धोकादायक विषाणूची तटस्थ रहाण्याची क्षमताही 4.4 पटीनं वाढली.