Special Report | ओमिक्रॉनचा त्रास कमी, पण ताण जास्त झालाय ?
ओमिक्रॉन बाधितांना फार त्रास होत नाही. पण ओमिक्रॉनचा दुसरा साईड इफेक्ट म्हणजे ओमिक्रॉनमुळे सरकारी यंत्रणांवरील ताण वाढू लागला आहे. कारण एकाच वेळाला असंख्य डॉक्टर्स, पोलीस, वकील, परिवहन कर्मचारी बाधित होत आहेत. ओमिक्रॉनमुळे रुग्णालयांबाहेर रांग लागली नसली तरी इतर यंत्रणांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

बहुतांश रुग्णांना ओमिक्रॉन हा एखाद्या तापाप्रमाणे भासतोय. पण ओमिक्रॉनमुळे सरकारी यंत्रणांवर मोठा ताण पडू लागला आहे. जे अमेरिकेत घडत आहे, तशीच स्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. सेवा देणारे लोक मोठ्या प्रमाणात बाधित होत असल्यामुळे उर्वरित लोकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकट्या मुंबईत सध्या 523 पोलीस कोरोनाबाधित आहेत. पोलीस खात्यात आयपीएस दर्जाच्या 18 अधिकाऱ्यांना कोरोना झालाय. ज्यात मुंबई पोलीस दलातील एक सह पोलीस आयुक्त, 4 अप्पर पोलीस आयुक्त आणि 13 पोलीस उपायुक्तांचा समावेश आहे. कोरोना लागण झालेल्या पोलिसांमध्ये सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अतुल पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनाही कोरोना झाला आहे.