Special Report | शिवीगाळ करणारा तो नेमका कोण?

Special Report | शिवीगाळ करणारा ‘तो’ नेमका कोण?

| Updated on: Sep 26, 2021 | 9:36 PM

पुणे महापालिकेतील कामाच्या लॉकिंग बिलासंदर्भात आमदारांनी महिला अधिकाऱ्याला फोन केला. बिलं काढता की नाही, काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो, असं म्हणत महिला अधिकाऱ्याला आमदारांनी धमकाविण्याचा प्रयत्न करत अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली.

पुणे : पुण्यातील भाजप आमदाराची एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अतिशय अर्वाच्य भाषेत भाजप आमदार महिला अधिकाऱ्याला बोलत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून ऐकायला मिळतंय. पुणे महापालिकेतील कामाच्या लॉकिंग बिलासंदर्भात आमदारांनी महिला अधिकाऱ्याला फोन केला. बिलं काढता की नाही, काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो, असं म्हणत महिला अधिकाऱ्याला आमदारांनी धमकाविण्याचा प्रयत्न करत अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. “किती वेळा त्याने तुमच्याकडे यायचं, काम होणार आहे की नाही, नसेल तर तसं सांगा, मी बघतो मग काय करायचं?”, असं आमदार तावातावाने अधिकाऱ्याला म्हणत आहे. त्यावर महिला अधिकारी तुम्ही आमच्या साहेबांना फोन करा, असं सांगतात. त्यावर मी काय तुमचा नोकर आहे का?, तुम्ही तुमच्या साहेबाला फोन करा, आणि मला परत 10 मिनिटांत फोन करा, असं आमदार म्हणतात.

Special Report | दिल्ली दौऱ्यावर ठाकरे, पुण्यात संजय राऊतांचे इशारे!-
Special Report | अमित शाह-उद्धव ठाकरेंची लंच डिप्लोमसी, नक्षलग्रस्त भागासाठी 1200 कोटी द्या : ठाकरे