Special Report | बॉलिवूडचं ‘ड्रग्ज कनेक्शन’, आतापर्यत सात कलाकारांची चौकशी
अभिनेचा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडचं कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर अनेक कलाकार एनसीबीच्या रडारवर होते.
अभिनेचा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडचं कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर अनेक कलाकार एनसीबीच्या रडारवर होते. सुशांतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती एनसीबीच्या जाळ्यात सापडली. ड्रग्ज प्रकरणात तिला एक महिना जेलमध्ये राहावं लागलं. सुशांतला ड्रग्ज पुरविल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर श्रद्धा कपूरही एनसीच्या रडारवर सापडली होती. श्रद्धानंतर अर्जुन रामपाल, रकुल प्रीत, दीपिका पदुकोण यांची चौकशी करण्यात आली होती.