Special Report | धर्म, जात, लग्न, खंडणी प्रकरणाला किती पाय फुटले ?
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी एक मोठी कारवाई केली. कार्डेलिया या प्रवासी जहाजावर ही कारवाई केली. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांना अटक केली.
मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या बाबत वाद सुरू आहे. त्यांच्या विरोधात अनेक आरोप केले जात आहेत. समीर वानखेडे हे गेल्या सव्वा वर्षापासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर आहेत. मात्र, आताच हा वाद का ? कधी ? कसा आणि कोणत्या कारणामुळे हा वाद सुरू झाला, याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी एक मोठी कारवाई केली. कार्डेलिया या प्रवासी जहाजावर ही कारवाई केली. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांना अटक केली. तिघांकडे काही प्रमाणात गांजा, एमडी ड्रग्स सापडलं.