Special Report | संघर्ष वाढला, कोण कोणाला जेलमध्ये टाकणार ?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रानं यंत्रणेचा वापर केला तर महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं असं म्हटलं होतं. त्यावरुन देखील मलिकांनी प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती केली. जम्मू काश्मीरमध्ये होणारे दहशतवादी हल्ले, पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव, महागाई, शेतकरी आंदोलन या मुद्यावरुन नवाब मलिकांनी भाजप आणि संघासमोर प्रश्न उपस्थित केले. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रानं यंत्रणेचा वापर केला तर महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं असं म्हटलं होतं. त्यावरुन देखील मलिकांनी प्रत्युत्तर दिलंय.