Special Report | भाजपच्या नेत्यांना नेमकं काय सांगायचंय ?
मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे ईडी काही येणार नाही इकडं. आमच्या कर्जाचे आकडे बघितले तर ईडीलाही वाटेल काय माणसं आहेत की काय आहेत, असे वक्तव्य संजय काका पाटील यांनी केले आहे.
नाशिक : हर्षवर्धन पाटलांनंतर आता संजय काका पाटलांचीही त्यात भर पडली आहे. मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे ईडी काही येणार नाही इकडं. आमच्या कर्जाचे आकडे बघितले तर ईडीलाही वाटेल काय माणसं आहेत की काय आहेत, असे वक्तव्य संजय काका पाटील यांनी केले आहे. तसेच नेत्यांच्या कारचा फंडाही त्यांनी सांगितला. हर्षवर्धन पाटील यांनी मावळमध्ये एका खासगी कार्यक्रमात बोलताना गमतीगमतीत एक वक्तव्य केलं. भाजपमध्ये आल्यापासून शांतपणे झोप लागते. कसली चौकशी नाही, असं पाटील म्हणाले होते. तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवून आम्हालाही शांत झोप लागते. आम्हालाही झोपेच्या गोळ्या घ्यायची गरज लागत नाही, असं वक्तव्य करुन संजय राऊतांनी पु्न्हा भाजपवर बोचरी टीका केली.