Nagpur | लॅाकडाऊनमुळे मोबाईलचा वापर वाढला, सुखी संसारात वादाला ठिणगी
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तसेच लॅाकडाऊनच्या काळात मोबाईलच्या अतिवापराचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. घरात असताना जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर राहणे, चॅटिंग करणे, सोशल मिडियाचा अतिवापर करणे यामुळे कुटुंबामध्ये संशयाचं भूत तयार होत आहे. याच मोबाईलने अनेकांच्या सुखी संसारात विष कालवलंय. तशा अनेक तक्रारी नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलकडे दाखल करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार भरोसा सेलकडे […]
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तसेच लॅाकडाऊनच्या काळात मोबाईलच्या अतिवापराचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. घरात असताना जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर राहणे, चॅटिंग करणे, सोशल मिडियाचा अतिवापर करणे यामुळे कुटुंबामध्ये संशयाचं भूत तयार होत आहे. याच मोबाईलने अनेकांच्या सुखी संसारात विष कालवलंय. तशा अनेक तक्रारी नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलकडे दाखल करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार भरोसा सेलकडे मागील पाच महिन्यात 704 तक्रारी, तर दोन महिन्यांत 236 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
Published on: Jun 06, 2021 06:58 PM