Special Report | राज्यभरातील मुसळधार पावसाच्या सुपरफास्ट बातम्या | 29 Sept 2021
जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील अनेक भागाला पावसाने झोडपून काढले आहे. तब्बल 20 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून, चाळीसगावातल्या तितूर नदीला वर्षातला पाचवा महापूर आला आहे.
जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील अनेक भागाला पावसाने झोडपून काढले आहे. तब्बल 20 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून, चाळीसगावातल्या तितूर नदीला वर्षातला पाचवा महापूर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाचे थैमान सुरू आहे. नाशिकसह साऱ्या उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रकोपाने हाहाकार उडाला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या 20 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यात चाळीसगाव, जामनेर, पाचोरा आणि भडगावचा समावेश आहे. चाळीसगावमध्ये तितूर नदीला पाचवा महापूर आला आहे. पाचोऱ्या तालुक्यातल्या हिवरा नदीच्या पुरात साहेबराव पांचाळ (वय 25) हा तरुण वाहून गेला आहे. पुरामुळे अनेक गावांमधील घरात पाणी शिरले आहे. हातातोंडाशी आलेला खरिपाच्या पिकाचा घास हिरावून नेला आहे. जोरदार पावसाने भागातील धरणे भरत आली आहेत. त्यात गिरणाचा पाणीसाठा 80 टक्क्यांवर पोहचला आहे. मन्याड धरणातून पाच हजार क्यूसेक आणि जामदरा बंधाऱ्यातून पंधरा हजार क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. सोबतच या भागातले हिवरा, अग्नावती, मंगरूळ, तोंडापूर हे मध्य प्रकल्प भरले आहेत. पारोळा तालुक्यातील बोरी प्रकल्पाचे दरवाजे उघडून त्यातून 4 हजार 59 क्यूसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.