Special Report | ड्रग्जखोरांचा कर्दनकाळ गोत्यात कसा आला ?
एक अल्पसंख्याक उमेदवार बनावट दाखले सादर करुन अनुसुचित प्रवर्गातून अधिकारी झाला,असा गंभीर आरोप करत त्याच न्यायाने 15 कोटी मुस्लिमांना अशी नोकरी मिळेल काय?, असा खडा सवाल ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
मुंबई : “समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असून एका गरीब अनुसूचित प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्याची नोकरी त्यांनी हिसकावून घेतली आहे. त्यांचा जन्माचा दाखला आणि जात प्रमाणपत्र खोटं निघालं तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. एक अल्पसंख्याक उमेदवार बनावट दाखले सादर करुन अनुसुचित प्रवर्गातून अधिकारी झाला,असा गंभीर आरोप करत त्याच न्यायाने 15 कोटी मुस्लिमांना अशी नोकरी मिळेल काय?”, असा खडा सवाल ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तर दुसरीकडे निकाहावेळी समीर यांनी दाऊद असंच नाव घेतलं होतं. आम्ही मुलाला त्याचं पूर्ण नाव सांगायला सांगतो, तसंच तुमचा निकाह शबाना यांच्यासोबत एवढ्या महरवर करत आहोत, तुम्हाला हे मान्य आहे? तेव्हा मुलगा म्हणते मान्य आहे. त्यानंतर स्वाक्षरी केली जाते. महरच्या समोरही स्वाक्षरी केली जाते. निकाह लावणारा काझीही त्यावर स्वाक्षरी करतो. तिथे उपस्थित असलेले साक्षीदारही आपली स्वाक्षरी करतात, असं मौलाना म्हणाले. त्याचबरोबर टीव्ही 9 च्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर समीर वानखेडे यांनी आपल्या वडिलांचं नाव दाऊद असंच सांगितल्याचंही ते म्हणाले.