Special Report | देशात काय घडतंय ?
दारू स्वस्त असो किंवा महाग कमी प्रमाणत सेवन केल्यास दारु (Alcohol) औषधासारखी असते, असे अजब तर्कट प्रज्ञा ठाकूर यांनी मांडले आहे. दारुबद्दल बोलताना त्यांनी थेट आयु्र्वेदाचा दाखला दिलाय. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
नवी दिल्ली : भाजप(BJP) खासदार तथा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या काही वक्तव्यांमुळे तर मोठा वाद निर्माण झालेला आहे. यावेळी मात्र ठाकूर यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. दारू स्वस्त असो किंवा महाग कमी प्रमाणत सेवन केल्यास दारु (Alcohol) औषधासारखी असते, असे अजब तर्कट प्रज्ञा ठाकूर यांनी मांडले आहे. दारुबद्दल बोलताना त्यांनी थेट आयु्र्वेदाचा दाखला दिलाय. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.