संकट काळात अमेरिकेने पाठ दाखवली, भारताचा जुना दोस्त मदतीसाठी पुन्हा धावला, रशियासोबत ‘या’ देशांची भारताला साथ
संकट काळात अमेरिकेने पाठ दाखवली, भारताचा जुना दोस्त मदतीसाठी पुन्हा धावला, रशियासोबत 'या' देशांची भारताला साथ
भारत सध्या कोराना संकटाशी झुंजत आहे. या संकट काळात कोरोना प्रतिबंधक लसीची लसीकरणाची मोहिम युद्ध पातळीवीर सुरु आहे. मात्र, या लसीसाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेने रोखून धरला आहे. कोरोना संकटात अमेरिकेसह युरोपातील काही देशांनी भारताच्या मदतीसाठी पाठ दाखवली आहे. मात्र, भारताचा जुना मित्र पुन्हा मदतीसाठी धावून आला आहे. रशियाने भारताला या संकट काळात अनेक गोष्टींसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. रशिया पाठोपाठ इस्त्रायल, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स मदतीसाठी पुढे आले आहेत. तर काही देशांनी चक्क भारतीयांसाठी बंदी घातली आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !