चेतन पाटील यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटिकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर चेतन पाटील यांनी ‘लोकमत’ वृत्तपत्रात इंटर्नशीप केली आहे. चेतन यांनी ‘लोकमत’मध्ये काम करत असताना आयुष्यात सर्वात पहिल्यांदा ‘लाडली’ पुरस्कार सोहळ्याचं वृत्तांकन केलं होतं. यानंतर त्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित बातम्यांचं वृत्तांकन केलं. लोकमतची इंटर्नशीप पूर्ण झाल्यानंतर चेतन यांनी दक्षिण मुंबईतील ‘माय चॅनल’ या लोकल वाहिनीत काही दिवस काम केलं. यानंतर त्यांनी ‘न्यूज 24’ या वृत्तवाहिनीत इंटर्नशीप केली. यानंतर त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीत असायमेंट डेस्कवर काम केलं.
चेतन पाटील यांना मे 2018 मध्ये ‘आपलं महानगर’सोबत काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्यांची ऑनलाईन पत्रकारितेच्या कारकीर्दीला सुरूवात झाली. ‘आपलं महानगर’च्या ‘माय महानगर’ वेबसाईटसाठी काम करत असताना चेतन पाटील यांनी आयपीएलच्या मोसमात यूट्यूबवर स्पेशल सीरिज केली. याशिवाय राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या केल्या. ‘माय महानगर’मध्ये दोन वर्ष काम केल्यानंतर त्यांना ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीच्या डिजीटल टीममध्ये काम करण्याची संधी चालून आली. चेतन पाटील यांनी दोन वर्ष ‘टीव्ही 9 मराठी’सोबत काम केल्यानंतर त्यांना ‘न्यूज 18 लोकमत’सोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी इथे जवळपास वर्षभर काम केलं. यानंतर त्यांना पुन्हा ‘टीव्ही 9 मराठी’सोबत काम करण्याची संधी मिळाली.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील यांची अहिराणी भाषेसाठी, खान्देशासाठी आणि अहिराणी कलाकारांसाठी काम करण्याची इच्छा आहे. ते संधी मिळेल तसा त्याबाबतच्या बातम्यांना न्याय देण्याचा प्रयत्नही करतात.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.