Special Report | ...तर रझा अकादमीला संपवून टाकू!

Special Report | ‘…तर रझा अकादमीला संपवून टाकू!

| Updated on: Nov 13, 2021 | 10:47 PM

केवळ राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी हे सर्व प्रकार सुरू असून दंगखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरी यांनी सांगितलं. तसेच जे मॉब लिंचिंग करतात, ज्यांच्यावर बंदी घालण्याची गरज आहे, त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही, अशा शब्दात नुरी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवला.

मुंबई: राज्यातील काही भागात हिंसाचार झाला आहे. त्याच्याशी रझा अकादमीचा संबंध नाही. आम्ही शांततेत बंद करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, तरीही हिंसा घडली. या मागे कोण आहे हे माहीत नाही. केवळ राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी हे सर्व प्रकार सुरू असून दंगखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरी यांनी सांगितलं. तसेच जे मॉब लिंचिंग करतात, ज्यांच्यावर बंदी घालण्याची गरज आहे, त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही, अशा शब्दात नुरी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवला. रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरी यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दंगल भडकविण्याचे आरोप फेटाळून लावले. आम्ही बंदचं आवाहन केलं होतं. शांततेत बंद करण्याचं आवाहन केलं होतं. कोणावरही जबरदस्ती करू नका सांगितलं होतं. आम्ही हिंसेचा निषेध नोंदवतो. पोलिसांनी दंगेखोरांवर कठोर कारवाई करावी, असं नुरी म्हणाले.

Gadchiroli | गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक, 26 नक्षलवादी ठार
Special Report | विलीनीकरणावर बैठकीत काय ठरलं?