Special Report | ‘सामना’तील अग्रलेखावरुन देवेंद्र फडणवीसांचा संताप!
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून खासदार संजय राऊत हे भाजप आणि भाजप नेत्यांवर सातत्यानं निशाणा साधत आहेत. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. सामनाचा दर्जा आता राहिला आहे का? बाळासाहेबांचा सामना आता उरला नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांचा प्रत्युत्तर दिलंय. सामना सातत्याने आपली भूमिका बदलत असतो, त्यामुळे मला यापुढे सामनाबाबत विचारु नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

आजच्या सामनात महिला अत्याचारावर बोट ठेवत बोरिवलीतील भाजप कार्यालयातील प्रकारावर भाष्य करण्यात आलं आहे. तत्पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सामनातून जोरदार टीका करण्यात आली होती. ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यात आल्यानंतर सामनातून राज्यपालांची स्तुतीही करण्यात आली. तर चंद्रकांत पाटील यांनी सामना अग्रलेखातील टीकेला ज्या पत्राद्वारे उत्तर देण्यात आलं होतं. ते पत्रही सामनात छापण्यात आलं होतं. त्याबाबत आज देवेंद्र फडणवीस यांनी सामनावर आणि पर्यायानं खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय.