Special Report | कोरोना संकटात महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांनी चिंता वाढवली!
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाची स्थिती गंभीर बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाची स्थिती गंभीर बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोल्हापुरात जात कोरोना स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, राज्यातील कोणत्या 6 जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती गंभीर बनलीय, पाहूया