Special Report | मोदी मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुंडे भगिनी नाराज?
केंद्रात प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या दोन्ही भगिनींनी एकाही मंत्र्याचं अभिनंदन न केल्याने तर त्यांच्या नाराजीच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे.
केंद्रात प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या दोन्ही भगिनींनी एकाही मंत्र्याचं अभिनंदन न केल्याने तर त्यांच्या नाराजीच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते भडकले. कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत. तुम्हाला कुणी सांगितलं? असा सवाल करतानाच उगाच काहीही बदनामी करू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. कृपा करून कारण नसतान त्यांना बदनाम करू नका. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका, असंही फडणवीस म्हणाले.