Special Report | बीड जिल्ह्याच्या बदनामीवरुन पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये खडाजंगी – Tv9

| Updated on: Mar 20, 2022 | 9:11 PM

माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे या राजकारणातील भावा-बहिणीमध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याची बातमी आली होती. त्यावरुन पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याची बदनामी करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता.

बीड : माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे या राजकारणातील भावा-बहिणीमध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याची बातमी आली होती. त्यावरुन पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याची बदनामी करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. ‘जिल्ह्याची बदनामी सुरु आहे. त्याला एखादा जिल्हा शल्य चिकित्सक जबाबदार असेल, जिल्हाधिकारी जबाबदार असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार असतील, पीएससीचे सगळे डॉक्टर जबाबदार असतील त्यांना जबाबदार धरायचं. काहीही झालं की बीड जिल्ह्याची बदनामी करण्याचं काम सुरु आहे’, असं धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यावर आता पंकजा मुंडे यांनी पलटवार केलाय. ‘बीड जिल्ह्याची मी काळजी करते, तुमच्या निष्काळजीपणामुळेच जिल्ह्याची बदनामी होतेय’, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केलीय.

Congress, NCP ची दुटप्पी भूमिका, शिवसेनेला न्याय कधी? Rajesh Kshirsagar यांचा सवाल
Girish Mahajan यांच्या मुलीच्या लग्नाला Devendra Fadnavis आणि Amruta Fadnavis यांची हजेरी -Tv9