Special Report | पेट्रोलपंपावर सैन्य तैनात करण्याची वेळ का?-tv9
अखेर पेट्रोल-डिझेल दरवाढीने एकदाचा मुहूर्त गाठलाच. आज इंधन दरवाढ लागू झाली. मंगळवारपासून इंधनाच्या दरात 80 पैशांची वाढ झाली. 137 दिवसानंतर ही दरवाढ लागू होत आहे. नवीन किंमती आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाल्या.
अखेर पेट्रोल-डिझेल दरवाढीने एकदाचा मुहूर्त गाठलाच. आज इंधन दरवाढ लागू झाली. मंगळवारपासून इंधनाच्या दरात 80 पैशांची वाढ झाली. 137 दिवसानंतर ही दरवाढ लागू होत आहे. नवीन किंमती आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाल्या. सोमवारी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, मध्यरात्री दरवाढीसंदर्भात डीलरने माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 80 पैसे प्रती लिटरची दरवाढ झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शेवटची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर दिवाळी व पुढे निवडणुका (Election) यामुळे सरकारने दरवाढ थोपवल्याची चर्चा रंगली होती. तसेच निकालानंतर लगेचच मोठी दरवाढ होईल अशी भीती व्यक्त होत होती.