Special Report | शिवभोजन केंद्रात थाळी शौचालयात धुतल्या!-tv9
यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवथाळी केंद्रातील भयाण वास्तव समोर आले आहे. या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जात आहे, ती जेवण झाल्यानंतर शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आला आहे.
यवतमाळ : ग्रामीण भागातील गरीब नागरिक शहरात आल्या नंतर ते उपाशी राहू नये, यासाठी राज्य सरकारने शिवथाळी भोजन सुरू केले. मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवथाळी केंद्रातील भयाण वास्तव समोर आले आहे. या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जात आहे, ती जेवण झाल्यानंतर शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सत्तेत असलेल्या पक्षाशी संबंधित महिलेचे हे शिवथाळी भोजनकेंद्र असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सरकारच्या हेतूला हरताळ फसला जात असल्याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर अशा किळसवाणा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.
Published on: Mar 29, 2022 09:31 PM