Special Report | Modi आणि Pawar भेटीत भाजप नेत्यांवरील संभाव्य कारवाईवरुन चर्चा? -Tv9
दोन नेत्यांच्या भेटीत तीन मुद्द्यावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यात संजय राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईबाबत चर्चा झाली. त्याबाबत मोदींशी चर्चा केली असल्याचे शरद पवारांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. महाराष्ट्रत बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे, त्यावरून बराच वादंग झाला आहे,याही मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.
मोदी आणि पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली? हा प्रश्न भेट झाल्यापासून काही तासांपासून संपर्ण राजकीय वर्तुळाला पडला होता. राज्यातले नेतेही या भेटीवर जोरदार प्रतिक्रिया देत होते. ईडीच्या कारवाईबाबतही ही भेट असू शकते असे भाजप नेते सांगत होते तर ही भेट 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत आहे, असे अजित पवारांपासून सर्व महाविकास आघाडीचे नेते सांगत होते. या दोन नेत्यांच्या भेटीत तीन मुद्द्यावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यात संजय राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईबाबत चर्चा झाली. त्याबाबत मोदींशी चर्चा केली असल्याचे शरद पवारांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. महाराष्ट्रत बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे, त्यावरून बराच वादंग झाला आहे,याही मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.