Special Report | सचिन वाझे पाठोपाठ, प्रदीप शर्माही तळोजा जेलमध्ये!
NIA ने अटक केलेले हे पाचही माजी पोलीस अधिकारी आता तळोजा कारागृहात पोहोचलेत. प्रदीप शर्मा हे NIA च्या कोठडीत होते, मात्र आजच त्यांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व आरोपी एकाच कारागृहात बंद राहणार आहेत.
अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर झाडाझडती सुरु आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने अनेक जणांवर अटकेची कारवाई केली. यामध्ये मुंबई पोलिसातील सुनील माने, रियाझ काझी,निलंबित कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि त्यानंतर माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा. NIA ने अटक केलेले हे पाचही माजी पोलीस अधिकारी आता तळोजा कारागृहात पोहोचलेत. प्रदीप शर्मा हे NIA च्या कोठडीत होते, मात्र आजच त्यांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व आरोपी एकाच कारागृहात बंद राहणार आहेत.